सोलापूर

मतदारांना मतदान करण्यासाठी खालील पुरावे ग्राह्य धरले जाणार

सोलापूर, दिनांक 16:-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता जे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत असे मतदार त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त पुढीलप्रमाणे नमुद कागदपत्रे पुरावा म्हणून सादर करु शकतील. आधार कार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बॅँकापोस्ट ऑफिसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक , कामगार मंत्रालयाच्या योजने अंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्ट्रर्‌ जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशर रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्रराज्य सरकार/ सार्वजनिक उपक्रम/ पल्बिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना/आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र हे पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

तरी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी बुधवारी दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपण मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हा प्रशासना मार्फत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button