सोलापूर. : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर या कार्यालयात 6 महिन्याच्या कालावधीकरिता बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी पध्दतीने पदाची सेवा पुरविणाऱ्या नोंदणीकृत कार्यरत बेरोजगार सेवासुस्थांकडून सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर कार्यालयासाठी अकुशल 2 शिपाई उपलब्ध करून देण्याकरिता दरपत्रक मागविण्यात आले होते, ते विहीत मुदतीत प्राप्त न झाल्यामुळे परत दरपत्रक सादर करण्यासाठी बेरोजगार सेवासंस्थाना 7 दिवसाची मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कौशल्या विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त हनमंत नलावडे यांनी दिली आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता विभाग शासन निर्णयानुसार दि 11 डिसेंबर 2015 मधील अटी व शतींची पूर्तता करणाऱ्या व पदांची सेवा पुरविण्यास इच्छुक असणाऱ्या बेरोजगाराच्या सेवा सहकारी संस्थांनी आपले दरपत्रक व इच्छापत्र सदरची जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून 7 दिवसांच्या आत कार्यालयास सादर करावे असे आवाहन जिल्हा कौशल्या विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र.सहायक आयुक्त हनमंत नलावडे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पार्क चौक, नॉर्थकोट, सोलापूर-413001 येथे प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रमांक.0217-2992956 द्वारे संपर्क साधवा.




More Stories
“कॅण्डेल लाईट व्हिजील” अर्थात एचआयव्ही / एड्स या आजाराने दगावलेल्या पी.एल.एच.आय. व्ही व सी.एल.एच.आय. व्ही. यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिवे लावून श्रद्धांजली अर्पण.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
शहीद अशोक कामटे विचारमंचचे भव्य रक्तदान शिबीरात १३८ जणांचे रक्तदान आणि नेत्ररोग शिबीरात १६८ जणांची तपासणी