रायगड

पेण येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबीर

मराठी सारांश
पेणमध्ये १२ ऑगस्ट २०२५ रोजी शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबई व बाफना फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व संपूर्ण नेत्र तपासणी शिबिर आयोजित होणार आहे. विविध नेत्र तपासण्या, शुगर-बीपी चाचणी व मोफत शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

English Summary
On 12th August 2025, a free cataract surgery and complete eye check-up camp will be held in Pen, organized jointly by Shantilal Sanghvi Eye Institute, Mumbai and Bafna Foundation. The camp will offer various eye tests, sugar and BP check-ups, along with free surgery facilities.


सविस्तर माहिती
पेण शहरात येत्या मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी एक विशेष नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हा उपक्रम शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबई आणि बाफना फाउंडेशन, पेण रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे.

हे शिबीर गोपाळकृष्ण हॉल, पेण येथे सकाळी ९:३० ते दुपारी १:३० वाजेपर्यंत होणार आहे. यात कॉम्प्युटराइज्ड दृष्टी चाचणी, नेत्र दबाव तपासणी, शुगर व बीपी तपासणी, मोतीबिंदू निदान, डायबेटीस रेटीनोपॅथी तपासणी तसेच चष्म्याच्या नंबरची तपासणी केली जाणार आहे.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया वडाळा, मुंबई येथे केली जाईल. Surgery साठी जाण्या-येण्याची वाहन सुविधा, राहणे व जेवण या सर्व सेवा निःशुल्क असतील.

नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क:

  • जितेंद्र जाधव – 7400275012

  • विजय मोकल – 9822102277

  • अमेय म्हात्रे – 9673847561

लीना बाफना यांनी नागरिकांना या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button