पुणे – सोलापूर नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांमुळे माढा तालुक्याच्या कोंढार भागातील लोकांचे जीव धोक्यात

शिव निर्णय / टेंभुर्णी : पुणे सोलापूर हायवे वर भिमानगर येथे मूळ इस्टिमेट मध्ये क्रॉस पास उड्डाणपूल मंजूर असताना राजकीय हस्तक्षेपामुळे हे काम केले जात नाही त्यामुळे रस्ता ओलांडताना अनेक विद्यार्थी प्रवासी व कोंढार भागातील जवळपास शंभर जणांचे जीव आज पर्यंत गेले आहेत ६५ अपघातात अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे असे असताना या ठिकाणी गेले अनेक दिवसापासून या भागातील लोकांची मागणी असताना या ठिकाणी उड्डाणपूल झाला नाही आणि आता तर याच हायवेच्या सर्विस रोड वरून सोलापूर ते उजनी धरण पिण्याच्या पाईपलाईनचे काम सर्विस रोड उकरून बंद करून चालू असल्याने या भागातील नागरिकांना प्रवास करणे आपल्या जीवनावश्यक गरजांसाठी टेंभुर्णी भिमानगर माढा कुर्डूवाडी सोलापूर या ठिकाणी जाण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे परंतु नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना मात्र गोरगरीब शेतकऱ्यांच्या जीवाची अजिबात किंमत वाटत नाही त्यांच्या या बेमूर्तखोर पणा मुळें किती जणांचे जीव जाणार . आपल्या लाचखोरी तर त्यांच्या व राज्यकर्त्यांच्या लाचारीमुळे आणखी किती बळी हवे आहेत . अशी अर्त याचना या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकारी नँशनल हायवेचे प्रोजेक्ट डायरेक्टर कदम साहेब केंद्रीय रस्ते विकास गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की नॅशनल हायवेच्या मूळ इस्टिमेट मध्ये माढा तालुक्याच्या कोंढार भागातील आडेगाव वडोली चांदज टाकळी(टें) गारअकोले आलेगाव खुर्द रुई आलेगाव बुद्रुक रांजणी इत्यादी सोळा गावातील नागरिकांना नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजांसाठी शासकीय कामासाठी टेंभुर्णी कुर्डूवाडी माढा सोलापूर पुणे जवळची बाजारपेठ इंदापूर या ठिकाणी जावे लागते परंतु या ठिकाणी हायवेवरील वाहनांचा प्रचंड वेग आणि प्रचंड गर्दी यामुळे हायवे पास करून पलीकडील बाजूला जाणे येणे शक्य होत नाही त्यामुळे अनेकांचे अपघात होऊन जीव गेले आहेत हा सर्व विचार करून या ठिकाणी उड्डाणपुलाची मागणी होत असताना हायवेची प्रशासन यंत्रणा आर्थिक लागेबांदी करून या उड्डाणपुलाच्या कामाकडे प्रशासकीय मंजुरी असताना टेंडर झालेले असताना डोळे झाक करत आहे त्यातच आता एकमेव पर्याय असलेला पुणे सोलापूर हायवे च्या बाजूचा हायवेचा सर्विस रोड सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन साठी नॅशनल हायवेने या ठेकेदारास विकला असून जनतेच्या जीवाचे अजिबात काळजी न करता या ठेकेदाराने ही शेटफळ पासून ते भिमानगर पर्यंतचा पूर्ण सर्विस रोड उकरून या रोड वरून पाण्याच्या पाईपलाईनचे काम चालू केले आहे टेंभुर्णी पासून भिमानगर पर्यंतचा या भागातील शेतकऱ्यांचा असलेला एकमेव पर्यायी मार्ग उकरुन बंद केल्याने त्यांना या भागातील प्रवाशांना प्रवास करणे अतिशय धोकादायक झाले असून जीव मुठीत धरून रस्ता ओलांडून जावे लागत आहे.तरी शासनाने याचा विचार करून उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईपर्यंत या पाईपलाईनचे काम तातडीने थांबवावे थांबवावे अन्यथा अन्यथा उड्डाणपुलाचे काम होईपर्यंत या भागातील तरुण बेमुदत पुणे सोलापूर हायवे बंद ठेवतील या हवेवर या भागातील 16 गावे पाठोपाठ साखळी मार्गाने रस्ता रोको करणार असल्याचा इशारा या भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
वास्तविक पाहता या रस्त्यावरील वाहनांची संख्या वाहनांचा वेग पाहूनच प्रशासनाने मूळ इस्टिमेट मध्ये सर्विस रोडची योजना केली आहे असे असताना पुणे सोलापूर हायवेच्या पाईपलाईन साठी दुसरी जागा अक्वायर करण्याची गरज असताना सर्विस हायवेच्या सर्विस रोड ची जागा पाण्याच्या पाईपलाईन साठी का देण्यात आली मोहोळ तालुक्यातील सेटफळ पासून ते ते उजनी धरणापर्यंत असलेला सर्विस रोड या ठेकेदारांनी कुणाच्या परवानगीने उकरून हा नादुरुस्त करून रुपये शासनाचे कोट्यावधी रुपये का पाण्यात घातले नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी या कामाला अशा पद्धतीने परवानगी का दिली हायवेच्या बाजूच्या खेडे पाड्यातील जनतेचे जीव अधिकाऱ्यांना महत्त्वाचे वाटले नाहीत काय.