March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

पशुसंवर्धन विभागाचे योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन  

सोलापूर दि.20 :- पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या कडील सन 2024-2025 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा परिषद उपकर योजना व जिल्हा वार्षिक योजनेमधून वैयक्तीक लाभाच्या विविध योजनेतील वैयक्तीक लाभाच्या योजना राबविण्यात येतात.  यासाठी पात्र लाभार्थीनी 22 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांनी केले आहे.

जिल्हा परिषद उपकर योजना

            आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या शेतमजुर व शेतकऱ्यांना 75 % अनुदानावर 4 शेळया व 1 बोकड वाटप करणे .  50% अनुदानावर पशुपालकांना मिल्कीग मशिन पुरविणे. 50% अनुदानावर मुरघास निर्मीतीस प्रोत्साहन देणे अंतर्गत सायलेज बॅग वाटप करणे.

जिल्हा वार्षिक योजना दुभत्या जनावरांना खादय उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखादय विकास कार्यक्रम)

50% अनुदानावर मुरघास निर्मितीस प्रोत्साहन देणे अंतर्गत सायलेज बॅग खरेदी करणे . खनिज मिश्रण वापरासाठी कमाल 2 दुधाळ पशुधनासाठी 33% अनुदान देणे.

वरील योजनांसाठी पात्र लाभार्थीकडुन अर्ज मागविण्यात येत असुन सदरचे अर्ज दिनांकः 23 सप्टेंबर 2024 पासून पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती तसेच सर्व पशुवैदयकीय दवाख्यान्यामध्ये उपलब्ध आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर (www.zpsolapur) उपलब्ध आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतीम तारीख दिनांक 22 ऑक्टोबर 2024 आहे.

तरी इच्छुक पात्र लाभार्थीनी वरील योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष, कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती तथा  मुख्य कार्यकारी अधिकारी कूलदीप जंगम, उपाध्यक्ष, कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती तथा अति. मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरळे एन. एल. यांनी केले आहे.