सोलापूर

नववर्षानिमित्ताने  मद्य विक्री अनुज्ञप्ती वेळेत शिथिलता

सोलापूर दि.२७:- नववर्षाच्या निमित्ताने  शासनाने अनुज्ञप्त्याच्या बंद करण्याच्या वेळेत सुट देवून एफएल-2. एफएल-3, सीएल-3, एफएलबिआर-2, एफएलडब्लू-2, एफएल-4 (क्लब अनुज्ञप्ती). नमुना ई (बिअर बार) व ई-2 अनुज्ञप्या च्या निर्धारित वेळेपेक्षा अधिककालावधीसाठी उघड्या ठेवण्यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 139 (1) (सी) व कलम 143 (2) (एच 1) (iv) अन्वये शासनाने मंजुरी दिलेली आहे.

           सोलापूर जिल्ह्यातील एफएल-2 (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान), एफएलडब्लु-2, एफएलबिआर-2 (बंद बाटलीतुन बिअर विक्री) रात्री 1.00 वाजे पर्यंत,  एफएल-3 (परवाना कक्ष), एफएल-4 (क्लब अनुज्ञप्ती), ई-2    पहाटे 5:00 वाजेपर्यंत व सीएल-3     महानगरपालिका तसेच “अ” व “ब” वर्ग नगरपालिका क्षेत्रातील अनुज्ञप्तीसाठी 1:00 वाजेपर्यंत सुरु राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button