‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ अंतर्गत…. दिव्यांगत्व प्रमाणपत्रासाठी कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन
*दिव्यांग व्यक्तींकरिता ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी 25 ठिकाणी शिबिरांचे आयोजन

या शिबिराच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना अन्य शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणार
सोलापूर, : जिल्ह्यात दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे. हे प्रमाणपत्र त्यांना सहज रित्या उपलब्ध व्हावे यासाठी या अभियानाच्या माध्यमातून दिनांक 19 ऑगस्ट ते 26 सप्टेंबर 2024 या कालावधीत जिल्ह्याच्या विविध ठिकाणी 25 शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरच्या माध्यमातून दिव्यांगत्वाची तपासणी व निदान करून त्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाणार आहे तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य असते. वेळेत दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळाले नसल्याने दरवर्षी शेकडो दिव्यांगांना शासकीय तथा इतर योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई होते. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्येशाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींनाकेंद्र शासनाच्या स्वावलंबन प्रणालीद्वारे निर्गमित दिव्यांगत्व प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. हाच दृष्टिकोण लक्षात घेऊन निर्धारित वेळेत दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता दि. १९/०८/२०२४ ते दि. २६/०९/२०२४ या कालावधीमध्ये ‘दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान’ दिव्यांगत्व प्रमाणपत्र विशेष मोहीम मा. जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या संकल्पनेतुन व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सोलापूर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सोलापूर जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींची डॉ. विशंपायन स्मुर्ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, सोलापूर येथील दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील तज्ञांमार्फत दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्राकरीता निश्चिती करून केंद्र शासनाच्या स्वावलंबन प्रणालीद्वारे त्यांना दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी तपासणी व निदान विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. सदर मोहिम पहिल्या टप्प्यात दि. १९/०८/२०२४ ते दि. २०/०९/२०२४ या कालावधीत ग्रामीण भागात आणि दि. २३/०९/२०२४ ते दि. २६/०९/२०२४ कालावधीत शहरी भागात राबविण्यात येत आहे.
जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद, सोलापूर व डॉ. विशंपायन स्मुर्ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर आणि जिल्हा सामान्य रुग्णालय, सोलापूर आणि मिशन इंस्टिस्टयुट फार र्टेंनिग रिसर्च एंड एक्शन (मित्र) यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, याकरिता जिल्हाधिकारी मा. कुमार आर्शिवाद; मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, सोलापूर, मा. मनिषा आव्हाळे, मोहिमेचे नोडल अधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी (म.व बा.वि.) मा. प्रसाद मिरकले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.सोलापूर; मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जि.प., सोलापूर च्या श्रीमती मीनाक्षी वाकडे; मित्र संस्थेचे अध्यक्ष अभिजित राऊत यांचे मार्फत सोलापूर जिल्हयातिल सर्व दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी अधिष्ठाता, शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्य./प्राथ.) जि.प./म.न.पा. सोलापूर, सर्व गट विकास अधिकारी, वैदयकिय अधिक्षक, तालुका आरोग्ग्य अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरण आरोग्य विभागातील सर्व वैद्यकिय तज्ञ, डॉक्टर्स आणि व्यावसायिक तज्ञ डॉक्टर्स यांचेद्वारे शहरी व ग्रामिण भागातील सामजिक संस्था, त्यांचे पालक, शिक्षक, अंगनवाडी सेविका, आशा वर्कर यांना तसेच दिव्यांग कल्याणार्थ कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्था आणि संघटना यांच्या अशा एकूण १६ प्रशिक्षण कार्यशाळाद्वारा एकूण ३७४२ व्यक्तींना प्रशिक्षित करून, त्यांच्या सहकार्याने ज्या व्यक्तींजवळ नविन दिव्यांगत्व नाहित अशा एकूण १५,६६६ दिव्यांग व्यक्तींची प्राथमिक माहिती सुध्दा प्राप्त झालेली आहे आणि जिल्हयातिल ११ हि तालुक्यातील समग्र शिक्षा अंतर्गत शिक्षण घेत असलेल्या एकूण १०१० बौधिक अक्षम असलेल्या बालकांचे बुध्दीगुणांक (IQ Testing) प्राथमिक तपासणी शिबिर जिल्हयातच्या ब्लाक व क्लस्टर स्तारावत एकूण ४३ विविध ठिकाणी दि. ३१/०७/२०२४ ते दि. १४/०८/२०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले. दिव्यांग व्यक्तींकरिता ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी सोलापूर जिल्हयातिल तालुकानिहाय ग्रामिण रुग्णालय तथा उप जिल्हा रुग्णालय अशा एकुण २५ ठिकाणी दिव्यांग बोर्डाच्या तज्ञ डॉक्टरांमार्फत एकूण १५,६६६ व्यक्तींची दिव्यांगत्व तपासणी व निदान करून पात्र दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या प्रचार प्रशिद्धि सुदधा करण्यात येणार आहेत.
याकरिता जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, ज्या दिव्यांग व्यक्तींकड़े जुने दिव्यांगत्व प्रमाणपत्र आहेत किंवा दिव्यांग प्रमाणपत्र नाही, त्यांनी दिव्यांगत्व प्रमाणपत्राकरिता निश्चित वेळापत्रकानुसार घेण्यात येणा-या शिबिरामध्ये उपस्थित रहावे.