March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

दक्षिण सोलापुरात अनेक गावांचा संपर्क तुटला, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, शेतकऱ्यांना अन् नागरिकांना सतर्कतेचा इशारा

दक्षिण सोलापुरात अनेक गावांचा संपर्क तुटला, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, शेतकऱ्यांना अन् नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 

   सोलापूर : सोलापूर शहराचे ग्रामीण भागातील मागील काही दिवसापासून सतत पडत असलेल्या संततधार पावसामुळे ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातून वाहणारी प्रमुख नदी सीना नदीत पाणी पातळीत भरमसाट वाढ झाली आहे
धरण क्षेत्र आणि नदी उगम क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसामुळे आणि लहान मोठ्या ओढे नाले यांच्यामुळे सीनेच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे.
मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथील दगडी पुल अर्जुनसोंड उत्तर सोलापूर तालुक्यातील तेलगाव सीना दक्षिण सोलापूर तालुक्यातील अकोलेमंद्रूप वडकबाळचा दगडीपुल राजुर आणि संजवाड या सीनानदीवरील अरुंद पुले पाण्याखाली गेले आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांचा सोलापूर शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणजे नंदुर बंधाऱ्याच्या कठड्याखाली पाणी आलेलं आहे. आणखी पाण्याचा विसर्ग वाढत असल्यामुळे हा सुद्धा बंधारा लवकरच पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
नागरिकांनी येण्या-जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्यात यावे महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने नागरिकांना आवहान करण्यात आलेलं आहे. सीना नदी पात्रात आणखी पाण्याची वाढ होणार असल्याचे शक्यता नाकारता येत नसल्यामुळे सीना नदी काठावरील सर्व शेतकऱ्यांना व नागरिकांना महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.