महाराष्ट्र
त्या तरुणांनी दाखवून दिले, नोकरी ऐवजी स्वीकारला व्यवसायाचा मार्ग,

पाली/ बेणसे (धम्मशील सावंत) असंख्य तरुण नोकरीच्या शोधात आणि नोकरी करत उमेदीचे दिवस खडतर करतात. अंगी असलेले कलाकौशल्ये, क्षमता चिकाटी नोकरीमध्ये पूर्णपणे वापरले जात नाही. शिवाय कमी पगारात उदरनिर्वाह करावा लागतो. निर्णय घेण्यासाठी मुभा देखील नसते. म्हणूनच नोकरी न करता उदयोग व्यवसायात उतुंग भरारी घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून नागोठणे येथील प्रशिक बिनेदार, विशाल बिनेदार (पनवेल) पंकज गायकवाड (रसायनी)या तीन तरुणांनी अथक मेहनत व जिद्दीच्या जोरावर स्वतःचा पेट्रोलपंप सुरू केला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर केळंबी खारपाले या ठिकाणी इंडियन ऑइल चे A3 एनर्जी सोल्युशन या पंपाचे नुकतेच शानदार उद्घाटन झाले आणि सर्वांसाठी पेट्रोल आणि डिझेल पंप सुरू करण्यात आला. सदर पेट्रोल पंपाचे उदघाटन परी प्रशिक बिनेदार,अर्हता विशाल बिनेदार
आदीराज पंकज गायकवाड या लहानग्या सदस्यांच्या हस्ते करण्यात आले. A3 एनर्जी सोल्युशन्सचे मालक आयु. प्रशिक भगवान बिनेदार, आयु. विशाल अशोक बिनेदार आणि आयु. पंकज काळुराम गायकवाड यांनी पाच वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर हा पंप सुरू करण्यात आला. प्रशिक, विशाल आणि पंकजने मोठ्या जिद्दीने मुंबई गोवा महामार्गावर पेट्रोलपंप उभारून तरुणाई पुढे ठेवला आदर्श ठेवला आहे. सदर पेट्रोल पंपाच्या कार्यपूर्ती मध्ये अनेक अडचणी आल्या , त्या अडचणींना सामोरे जाताना आयुनी. सुनिता भगवान चंदर बिनेदार, आयुनी लता अशोक चंदर बिनेदार,आयु. काळुराम गायकवाड, रिपब्लिकन पार्टीचे कोकण नेते व्ही. के. जाधव , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोहा तालुका अध्यक्ष तसेच बहुजन विद्यार्थी संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष गायकवाड , जागेचे मालक जे. एच. पाटील गुरुजी आणि बी. जे.पाटील गुरुजी यांचे वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत राहिले. दरम्यान तरुणांना पेट्रोल पंप सुरू करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन आम्ही करू असे प्रशिक बिनेदार याने सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी खारपाले गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सदस्या तसेच कोकण नेते व्ही.के.जाधव, बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी , पत्रकार धम्मशील सावंत, पनवेलचे प्रभाकर कांबळे, प्रकाश कांबळे, कृष्णा पारंगे, निलेश बाबरे, आर. जी. गायकवाड (कोकण नेते), बाळाराम कांबरी (अंबरनाथ तालुका पंचायत समिती सभापती), अमोल जाधव (सदस्य ग्रुप ग्रामपंचायत सावरे), महेश भिसे (युवा सेना), दिनेश घाग, सुनील लाड, राजेंद्र लवटे (मा. उपसरपंच पिगोंडे ग्रामपंचायत), महेंद्र ताडकर, डॉ. श्रीकृष्ण तूपरे, बबन झेंडे, संदीप मोहिते, प्रकाश जाधव, भाऊसाहेब गायकवाड, विकास जाधव, भीमराव जाधव, प्रशांत कांबळे, प्रज्योत जाधव, संदीप जाधव, दत्तात्रेय जाधव, अशोक जाधव, सुरेंद्र देशमुख, जयप्रकाश बनसोडे, सुधीर नायर सोहेल खान (मालक – इंडियन ऑईल पंप नागोठणे), दत्तात्रेय जाधव (रीटघर), अजिंक्य जाधव, अक्षता जाधव, मंगेश वाघे, जालिंदर गहिरे, लव पाटील, जे. डी. पवार, यशवंत शेलार, नदिर शेख, नवीन गट्टू,बौद्धचार्य सुनील वघपांजे, उद्योजक प्रवीण कांबळे, बौद्ध समाज युवा संघाचे पदाधिकारी, रघुनाथ जाधव, पंकज गायकवाड, भावेश कांबळे, विकास कांबळे सर्व नातेवाईक आणि मित्रमंडळी आदी उपस्थित होते.