क्राईम

टेंभुर्णी शहरानजीक अनोळखी पुरुषाचा खुन केले प्रकरणी आईसह चार जणांना केली अटक

टेंभुर्णी : दिनांक २६ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वा सुमारास सोलापूर ते पुणे जाणारे हायवे रोडजवळ लक्ष्मी पॅलेसचे समोरील कुबेर बाळासाहेब पाटील यांचे चव्हाणवाडी शिवारातील जमीनीचे मोकळे जागेत अनोळखी पुरुष वय ३० ते ३५ यावे प्रेत अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून, अज्ञात हत्याराने जीवे ठार मारून त्याचे प्रेत हे पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने कोणत्यातरी वाहनातून आणून टाकले होते. त्याबाबत पोहेका  विशाल विजय शिंदे यांनी फिर्याद दिल्याने पोलीस ठाण्यास गुरन २६७/२०२४, भादविक ३०२, २०१,१२० (ब), ३४ प्रमाणे दिनांक २६ मे २०२४ रोजी दाखल झाला होता.
गुन्हयांचे घटनास्थळी तात्काळ घटनास्थळावर टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पो.नि दिपक पाटील, सपोनि गिरीश जोग,पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, अजित मोरे यांनी भेट दिली. घटनास्थळ पोलीस अंमलदार यांचे मार्फत सुरक्षित केले. घटनास्थळाची बारकाईने पहाणी केली असता प्रेत हे कोणत्या तरी कार गाडीचे टायर मार्क दिसुन आले त्यावरून प्रेत हे कार कोणत्या तरी कार गाडीतुन आणुन टाकल्याचा संशय आल्याने टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी बारकाईने शोध घेणे करीता तपास पथकाचे दोन टिम केल्या. त्यामध्ये सपोनि गिरीश जोग, पो.उप.नि कुलदीप सोनटक्के व तपास पथकांचे अंमलदार असे टिम करण्यात आल्या. दरम्यानचे कालावधीत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीष सरवेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीणचे
 प्रितीम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभागाचे
अजित पाटील, स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व त्याचे पथकांने भेट दिले. नंतर वरीष्ठांनी गुन्हयांचे तपास कामी सुचना देउन मार्गदर्शन केले.
सदर गुन्हयाचे तपासात कार सारखे वाहनांचा वापर झाला असल्याचे दिसुन आल्याने त्यादृष्टीकोनातुन मयताची ओळख पटविणे करीता व अनोळखी आरोपीचा शोध होणे करीता प्रेत टाकले ठिकाणचे सर्व रोडवरील व जवळपासचे सी.सी.टी. ली. फुटेज चेक करून काही संशयीत कार निष्पन्न करून वरखडे टोल नाका व इंदापुर टोल नाका येथील फुटेज मधील घटनेच्या दरम्यानेचे जवळपास १५,००० कार चेक केले असता संशयीत कार ही सरडेवाडी इंदापुर येथील टोल नाक्यावरून दिनांक २६ मे २०२४ रोजी ११ वा सुमारास काचेस टॉवल व मागील बाजुस कपडा लावुन पास होत आल्याचे दिसुन आल्याने त्या कारचा नंबर निष्पन्न केला. त्यावरून सदरचे वाहनांचे फुटेजव्दारे ती कार वरखडे टोलनाक्याचे फुटेज पाहीले असता सदरची कार ही दिनांक २६ मे २०२४ रोजी दुपारी १.३० वा सुमारास पास झाल्याचे विसुन आले. त्यावेळी कारचे बाजुचे खिडकीचे टॉवल व कपडा लावल्याचे दिसुन आले नाही. त्यामुळे सदरची कार ही टेंभुर्णी येथे जातेवेळ थांबल्याचे दिसुन आल्याने कारचा नंबर निष्पन्न करून कारचे मालक यांचा शोध घेतला असता मालक तेलगंना राज्यातील असल्याने त्या ठिकाणी टेंभुर्णी पोलीस ठाणे कडील कुलदीप सोनटक्के व ही.बी. पथकाचे अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यांना पाठविण्यात आले होते. तपास करीता गेलेल्या पथकांने कार मालक यांचा शोध घेवुन तपास करीत असताना त्याच कालावधीत अनोळखी मयताचे घेण्यात आलेल्या फिंगर पिंट तपासणी करीता पाठविण्यात आले होते. मयताचे फिंगर प्रिंट वरून मयताचे नांव सुकुमार व्यंकटरामणा गोडोचेरला रा. सदाशिवपेठ, मेडक तेलंगणा असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून मयताचे नातेवाईक यांना फोटो दाखविले नंतर मयताची ओळख खात्रीशीर पटली मयताची आई अन्नपूर्णा व्यंकटरामणा तोराडी, बहिण विजयाकरूणा राजेंद्र चौधरी, थोरला भाऊ जीवनप्रसाद व्यंकटरामणा चौधरी, मेव्हणा राजेंद्र लिंगय्या चौधरी यांचे जबाब नोंदविले असता त्यांनी काही संशय व्यक्त केला नाही. यातील मयत हा आई अन्नपूर्णा व बहिण विजयकरूणा यांचे जवळ शेरलिंगमपल्ली जिल्हा रंगारेडडी यांना दारूपिवुन मारहाण करणे व इतर कारणावरून त्रास देत होता मयत हा मागील दोन महीने पासून घरी येत जात नव्हता असे सांगितले. टेंभुर्णी पोलीस ठाणे कडील पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के व डी. बी. पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे व त्याचे पथकांने मयत राहत असलेल्या ठिकाणी मयताचे नातेवाईक, मित्र, मयताची प्रेमिका, मयताची पत्नी, मयताचे शेजारी यांचेकडे बारकाईनी चौकशी केली असता मयताची आई, बहीण यांनी सांगितलेल्या घटने मध्ये तपावत होत असल्याचे दिसुन आल्याने मयत राहत असलेल्या शेजारील लोकांचे कडुन माहीती मिळाली कि, मयत हा दिनांक २५ मे २०२४ रोजी त्याचे रहाते घरी आला होता. त्यावरून तपास पथकांचे अधिकारी व अंमलदार यांनी त्याभागतील सर्व सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक केले असता मयत इसम हा एका फुटेज मध्ये दिसुन आल्याने सदर फुटेजचे आधारे मयताचे आई व बहीण यांचे कडे विश्वसात घेऊन चौकशी केली असता मयत हा घरात त्रास देत असल्याने मयताची आई व बहीण यांनी मयत सुकुमारला मारण्यासाठी त्यांचे गल्लीतील महंम्मद अकबर खान यास जिवे ठार मारण्याची सुपारी दिली होती.
यातील मुख्य आरोपी महंम्मद अकबर खान याची गोपनिय माहीती काढली असता तो मुंबई येथे असल्याची माहीती मिळाल्याने त्यास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरज निंबाळकर व स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी ताब्यात घेऊन पो.स्टे. हजर केले. आरोपी महंम्मद अकबर खान यांचे कडे विचारपुस करता त्यांने मयत सुकुमार यास दिनांक २५ मे २०२४ रोजी सायंकाळी ६ वा सुमारास मयताची आई अन्नपुर्णा व्यंकटरामणा तोराडी उर्फ गोडडुचेरला वय ६० वर्ष व मयताची बहीण विनयाकरूणा राजेंद्र चौधरी वय-४० रा. शेरलिंगमपल्ली नि. रंगारेडही तेलंगणा यांचे समक्ष मयतास नोकरी लावतो म्हणुन त्यास कार मध्ये बसविले. त्यावेळी मुख्य आरोपी महंमद अकबार खान यांचे सोबत मुनीरअली शब्बीरअली सय्यद वयः ३७, महिबुब वलिद अब्दुल वयः ३५ शेरलिंगमपल्ली, जिल्हा रंगारेड्डी राज्य तेलंगणा असे होते. सदरचे दिवशी प्रवास करून पुणे येथे गेले नंतर तेथुन मुख्य आरोपी यांने चाकु खरेदी केला. त्यानंतर पुणे येथुन सोलापुरकडे येत असताना दिनांक २६ मे २०२४ रानी दुपारी ११.४५ वा सुमारास मयत हा कारमध्ये मागील बाजुस बसला होता कार ही टेंभुर्णी येथील कुडुवाडी ब्रिन करून पास होत असताना मयतास चाकुने त्यांचे गळयावर, छातीवर एकुण १५ वार करून त्यास जिवे ठार मारले. त्यानंतर मयत सुकू‌मार याचे प्रेत हे बायपास रोडचे बाजुस सर्व्हिस रोड शेजारील मोकळ्‌या मैदानात टाकुन ते पुन्हा सोलापुर बाजुकडे निघुन गेले होते.
सदर गुन्हयांचे तपासता मयताची आई, बहीण व कार मधील तीन आरोपी असे एकुण पाच आरोपी अटक असुन गुन्हयांत वापरण्यात आलेली कार, चाकु, मयताचे अंगावरील कपडे, आरोपीचे अंगावरील कपडे जप्त करण्यात आले आहेत. सदरचा गुन्हा करते वेळी आरोपींनी गुन्हा करते वेळी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. तरी देखील टेभुर्णी पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तेलगंना राज्यात जावुन चार दिवस मुक्काम करून कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा चार दिवसात उघडकीस आणला आहे. गुन्हयांतील सर्व आरोपी हे मॅजिकस्टडी सब जेल सोलापुर येथे आहेत.
सदर गुन्हयांचे तपास मध्ये पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रामीण प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, करमाळा विभाग अजित पाटील, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापुर ग्रामीण संजय जगताप यांचे मार्गदर्शाना खाली टेंभुर्णी पोलीस ठाणे कडील स.पो. नि कुलदीप सोनटक्के, विलास रणदिवे, पोहेकॉ विलास नलवडे, पोहेकॉ संदीप गिरमकर, पोहेकॉ प्रदीप पर्वते, पोना विनोद साठे, पोकॉ तुकाराम माने देशमुख, मपोकॉ पुनम शिंदे, मपोकॉ पुनम देवकर, मपोकॉ/१९३८ मनिषा मंठोळे व स्थानिक गुन्हे शाखेकडील पो.उप.नि. सुबोध जमदाडे, पो.उप.नि. कांबळे, पो.उप.नि. सुरज निंबाळकर तसेव फिंगरप्रिंट तज्ञ सपोनि जालीवर गळवे, पोना सागर मठपती, पोलेका  गुटाळ, सायबर सेलचे पोलीस नाईक व्यंकटेश मोरे यांनी गुन्हयाचे तपास कामी योग्य ती मदत केली. त्यामुळेच उघडकीस न आलेला खुन वेळत उघडीकस आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button