टेंभुर्णी : टेंभुर्णी तालुका माढा येथे सालाबाद प्रमाणे गुरुवार दि. २२ फेब्रुवारी रोजी पांचाळ सुतार व समस्त लोहार समाज बांधवातर्फे राम मंदिर टेंभुर्णी येथे श्री प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संत तुकाराम महाजांचे ११ वे वंशज बाळासाहेब सानेश्वर माऊली यांचे सकाळी १० ते १२ वा. पर्यंत कीर्तन ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब देशमुख हे होते. या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले होते. त्या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ टेम्भूर्णीतील अनेक वृद्ध महिला पुरुषांनी घेतला. यावेळी प्रसाद व जेवण घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी नागेश बोबडे, ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ थोरात, आप्पा हवलदार, शैलेश ओहोळ, सोनाई दूध संघाचे संचालक व मा.ग्रा.पं.सदस्य गणेश केचे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुहास सुतार, स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी महेंद्र लोहार, मुकुंद सुतार, नागनाथ कांबळे, महेश कांबळे, नवनाथ सुतार, केशन सुतार, आकाश सुतार, सोमनाथ सुतार, महेश सुतार, केशव सुतार, सचिन सुतार, नागेश सुतार, मोरेश्वर सुतार, विशाल सुतार, विवेक सुतार, महेश लोहार, नवनाथ पवार, ट्विंकल स्टार स्कूलचे संस्थापक हरिश्चंद्र गाडेकर, पत्रकार धनंजय भोसले, अमोल खरसांडे, सोमनाथ खरसांडे, भैय्या हवलदार, योगेश हवालदार, दादा हवालदार टील्लू हवालदार, आकाश देशमुख, जयवंत देशमुख, गणेश खरसांडे, गणेश कांबळे, प्रविण लोहार, ज्ञानेश्वर कांबळे, संतोष थोरात, बलभीम कांबळे, कैलास चव्हाण, सचिन कळसाईत, सुयोग टकले, संतोष कळसाइत, मोहन कळसाईत, अनिल कळसाईत, हनुमंत कांबळे तसेच टेंभुर्णी येथील अनेक महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. लोहार व सुतार समाजातील समाज बांधव मोठया प्रमाणात उपस्थित होते. सूमसंचालन व आभार नगनाथ कांबळे यांनी मानले.




More Stories
“कॅण्डेल लाईट व्हिजील” अर्थात एचआयव्ही / एड्स या आजाराने दगावलेल्या पी.एल.एच.आय. व्ही व सी.एल.एच.आय. व्ही. यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिवे लावून श्रद्धांजली अर्पण.
मुख्यमंत्रीपदाच्या शपथेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
शहीद अशोक कामटे विचारमंचचे भव्य रक्तदान शिबीरात १३८ जणांचे रक्तदान आणि नेत्ररोग शिबीरात १६८ जणांची तपासणी