मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नांवाची घोषणा आघाडी करेल का ?

शिव निर्णय/पूणे : राज्यात आचार सहिता लागू झाली असुन २० नोव्हेबर ला मतदान होणार असुन त्याचा निकाल २३ नोव्हेबरला लागणार आहे. महाराष्ट्रामधे निवडणूकीचे बिलगुल वाजले असुन कोणाचे किती आमदार येणार तसेच मुख्यमंत्री कोण होणार या चर्चेला उधाण आले आहे.
लोकसभेच्या यशानंतर महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या अनुषंगाने पक्षाच्या व आघाडीच्या वतीने विभागवार आढावा बैठका, मिटींग, मेळावे चालू आहेत. परंतू युतीचा मुख्यमंत्री म्हणून कोणाच्याही नावाचा पाठिबा अथवा घोषित करण्यात आलेले नाही त्याच प्रमाणे आघाडीच्या वतीने अद्याप कोणाचेही नांव समोर आलेले नाही परंतू झालेल्या दसरा मेळावा मधे माजी मुख्यमंत्री यांनी आमचे सरकार आलेवर कांही निर्णय घेणार आहोत व कांही बेकायदेशीर काम करणार्या अधिकार्यांना ही सुचक सल्लाही दिला आहे आणि दसरा मेळावामधे पहिल्यांदा माजी पर्यावरण मंत्री व शिवसेनेचे युवा नेते अदित्य ठाकरे यांनी भाषण करून आपण ही आगामी काळातील शर्यतीत असल्याचे सुचक वक्तव्य केल्याने भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे होतील का ? अशा चर्चेला उधाण आले असुन त्यांच्या नावाची घोषणा करण्याची मागणी युवा सैनिकामधून केली जात आहे.
राज्यात आघाडीमधे मुख्यमंत्री होण्याबाबत स्पर्धा लागली असुन तीच परिस्थीती युतीमधे ही होवू शकते. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला दावा करित असले तरी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आम्ही आपणार मुख्यमंत्री पद सोडत आहोत तर तुम्ही कांही जागा वाटपा बाबत समझोता करावा असे सुचक वक्तव्य केले आहे तर सिनियर म्हणून अजित पवार ही मुख्यमंत्री होण्यास इच्छूक असल्याचे लपून राहिले नाही. कारण त्यांच्या कार्यकर्तै यांनी अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून फलक लावले आहेत तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस हे पुन्हा येणार असे म्हटले नसले तरी त्यांची इच्छा असणार आहे. तर आघाडी मधे बैठकावर बैठका चालू असुन शिवसेनेचे पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अनेक वेळा आघाडीतील मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करा शिव सेनेचा त्यांना पाठींबा असेल असे जाहीर सभेमधे सांगितले परंतू अद्याप ही आघाडीतील कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस यांनी चेहरा दिला नसल्याने तसेच दिल्लीतील पक्ष श्रेष्ठीच्या चर्चेतून शिव सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
राज्यातील मुंबई, कोकण तसेच मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रतून युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या नांवाचे चर्चेला उधाण आले असुन दसरा मेळाव्या नंतर मोठया प्रमाणात माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेच योग्य संयमी तरूण नेतृत्व असुन त्यांच्या नांवाला पसंती मिळत असल्याचे संकेत आहे.
लोकसभेमधे महाराष्ट्रात शिव सेना, युवा सेना, राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गट व काँग्रेस यांचा झंजावात निर्माण झाला आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही आघाडीला मोठे यश मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीत शिव सेनेला मोठे यश मिळवले. त्यामुळे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना मुंबईसह महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून पंसती मिळत आहे. त्यांना भावी मुख्यमंत्री म्हणून समोर आणावे त्याचा व तरूणांचा फायदा संपूर्ण महाराष्ट्र व आघाडीला होवू शकतो. भाजपाला सत्तेचा अहंकार होता. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने त्यांचा अहंकार उतरवला. राज्यातील महायुतीचे सरकार आहे. राज्यातील सरकार अनेक योजना आणल्या असुन आमचेच सरकार येणार असल्याचा दावा करित आहेत तर राज्यातील सरकार जाणार असल्याचे भाकित अनेक तज्ञ बोलून दाखवित आहेत. आघाडीचे नेतृत्व मा.शरदचंद्र पवार, मा.उध्दव ठाकरे व कॉग्रेसचे नाना पोटोले करित असले तरी मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा स्पष्ट होताना दिसून येत नाही परंतू या पदासाठी वाद ही नाही अथवा त्यांचे ठरले ही असेल ज्या पक्षाचे आमदार जास्त येतील त्या पक्षाकडे मुख्यमंत्री होईल असा निकष असल्याचे समजते. परंतू निवडणूकी नंतरची समिकरणे झाली असतील परंतू निवडणूकी अगोदर शिव सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व शिव सेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचे नांवाची शिव सेेनेच्या नेत्यांनी घोषणा केल्यास राज्यातील समिकरणामधे मोठा बदल होवू शकतो.
लोकसभेत १०० टक्के निकाल देणारे माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी आता राज्यातील आघाडीचे आमदार निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी. तसेच त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून नांवाची घोषणा आघाडी सह कॉग्रेस करेल का ? अशी आपेक्षा राज्यातील युवा वर्गात दिसून येत आहे.