March 22, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

जिल्हा कारागृहात धर्मादाय रुग्णालय मार्फत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जिल्हा कारागृहात धर्मादाय रुग्णालय मार्फत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

शिव निर्णय / सोलापूर :  जिल्हा कारागृहामध्ये सुनिता कंकणकवाडी मॅडम (न्यायाधीश), धर्मादाय उपायुक्त सोलापूर विभाग सोलापूर व सोलापूर जिल्हा कारागृह अधीक्षक  हरिभाऊ मिंड यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या वतीने कैद्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक 28.11.2023 ते 02.12.2023 रोजीपर्यंत एकूण पाच दिवस विविध वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात आली. त्यामध्ये

1.लायन्स क्लब ऑफ सोलापूर यांनी नेत्रविकार व पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत रुग्णालय केगाव यांनी दंतविकार तपासणी

2 नर्गिस दत्त हॉस्पिटल बार्शी व सिद्धेश्वर हॉस्पिटल सोलापूर यांच्यामार्फत कॅन्सर तपासणी

3.यशोधरा रुग्णालय सोलापूर यांनी मुतखडा व मुळव्याध तपासणी

4. शेट सखाराम नेमचंद आयुर्वेदिक रुग्णालय यांच्यामार्फत त्वचारोग तपासणी करण्यात आली

5. जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी यांच्यामार्फत बीपी,शुगर, सर्दी, खोकला व ताप यांची तपासणी करण्यात आली

अशा विविध रोगावर तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत तपासणी करून औषधे वाटप करण्यात आली. डोळे तपासणी करून डोळ्यांचे नंबर देऊन बंद्याना समता फौंडेशन, मुंबई यांच्या मार्फत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत . तसेच तज्ञ महीला वैद्यकीय अधिकारी यांचेकडून महिला विभागामध्ये आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले.
जिल्हा कारागृहात धर्मादाय रुग्णालय मार्फत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडणे करिता धर्मदाय आयुक्तचे इन्स्पेक्टर फुलसुंदर व कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी भाऊसाहेब आगवणे, तुरुंगाधिकारी गायकवाड निलेश व तुरुंगाधिकारी  प्रदीप बाबर, सुभेदार लष्करे नर्सिंग ऑर्डली राहुल राऊत व सीताराम मोरे यांनी विशेष परिश्रम घेतले.