महाराष्ट्र
जामा मस्जिद वरुन श्री गणरायावर पुष्पवृष्टी मुस्लिम समाजाचा स्तुत्य उपक्र

करमाळा :
करमाळा मुस्लिम समाजाच्या वतीने ईद ए मिलाद व अनंत चतुर्दशी च्या निमित्ताने श्री गणेश विसर्जन मिरवणूकी निमित्त सुभाष चौक येथे श्री देवीचा माळ येथील राजे रावरंभा तरुण मंडळाच्या श्री गणरायाच्या मिरवणूकीचे स्वागत फुलांची पुष्पवृष्टी करुन करण्यात आली असुन सर्व गणेश भक्ताना ईद निमित्त शेरणी प्रसादाचे वाटप करण्यात आले
यावेळी हाजी अल्ताफशेठ तांबोळी यांच्या हस्ते मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकारी चा सत्कार करण्यात आला तसेच पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे , उपनिरीक्षक प्रवीण साने पोलीस उपनिरीक्षक माहुरकर यांचाही सन्मान करण्यात आला यावेळी फारुक जमादार, फारुक बेग, वाजीद शेख, मजहर नालबंद, इमरान घोडके, साबीर तांबोळी, मोहसिन पठान, शाहरुख पठान, सलिम ताबोळी, आयुब बागवान, जिलाणी खान, मोहसिन तांबोळी, अफजल शेख आदी जण उपस्थित होते
तसेच वेताळ पेठ येथील जामा मस्जिद ट्रस्ट व जमात च्या वतीने श्री गणेश विसर्जन मिरवणूकी वर पुष्पवृष्टी करण्यात आली गेली ३७ वर्षा पासुन मुस्लिम बांधव अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणूकीत गणरायावर पुष्पवृष्टी करत आहे तसेच गणेश उत्सव मंडळाच्या सर्व अध्यक्ष पदाधिकारी व पोलीस अधिकारी सत्कार करण्यात आला हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जामा मस्जिद ट्रस्ट चे विश्वस्त जमीर सय्यद हाजी उस्मान सय्यद माजी नगरसेवक फारुक जमादार हाजी युसूफ नालबंद नासीरभाई कबीर रमजान बेग आझाद शेख सुरज शेख मुस्तकीन पठान ईमत्याज पठान जिशान कबीर राजु बेग युसूफ बागवान जहांगीर बेग सद्दाम मुलाणी अरबाज बेग आदी जणांनी परिश्रम घेतले
यावेळी सिंधी समाज छत्रपती शिवाजी तरुण मंडळ मुस्लिम समाज यांच्या वतीने सर्व गणेश भक्तासाठी अल्पउपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.