रायगड

रिलायन्स नागोठणे कंपनी फायर ब्रिगेडच्या मदतीने आगीवर नियंत्रण

 रिलायन्स नागोठणे

मराठी सारांश

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात बेणसे सिद्धार्थ नगर गावालगत लागलेल्या भीषण आगीत हजारो वृक्ष, झुडपे आणि जैवविविधता नष्ट झाली. ग्रामस्थ आणि तरुणांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. रिलायन्स नागोठणे कंपनीच्या फायर ब्रिगेडच्या मदतीने आग नियंत्रणात आली. मात्र, आपत्तीकाळात फायर ब्रिगेडच्या वाहनांसाठी मार्ग उपलब्ध नसल्याने अडथळे निर्माण झाले.

English Summary

A massive fire near Bense Siddharth Nagar village in Pen Taluka, Raigad, destroyed thousands of trees, shrubs, and biodiversity. Locals and youth attempted to control the fire. With the help of Reliance Nagothane Company’s fire brigade, the blaze was brought under control. However, the lack of proper access for fire trucks during emergencies posed significant challenges.


रिलायन्स नागोठणेरिलायन्स नागोठणे

दि. 25 फेब्रुवारी रोजी रायगडच्या पेण तालुक्यातील बेणसे सिद्धार्थ नगर गावाच्या लगत दुपारी अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थ आणि तरुणांनी तातडीने उपलब्द पाण्याचा वापर करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडाक्याचे उन्ह आणि सुकलेला पालापाचोळा यामुळे आग अधिक भडकली.

रिलायन्स फायर ब्रिगेडची मदत

आग आटोक्यात आणण्यासाठी रिलायन्स कंपनीच्या फायर ब्रिगेडला बोलावण्यात आले. विजय एटम यांच्या विशेष प्रयत्नांमुळे तातडीने फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचली आणि आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी रिलायन्स व्यवस्थापनाचे वरिष्ठ अधिकारी अविनाश श्रीखंडे, गौतम मुखर्जी आणि नागोठणे पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांना घटनेची माहिती देण्यात आली, त्यानंतर तातडीने मदत मिळाली.

फायर ब्रिगेडच्या मार्गात अडथळे

या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गावातील फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र मार्ग देण्याची मागणी केली आहे. रिलायन्स नागोठणेच्या नव्या प्रकल्पासाठी उभारण्यात येणारी संरक्षण भिंत भविष्यातील आपत्तीमध्ये अडथळा ठरू शकते. जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन आणि रिलायन्स व्यवस्थापनाने यावर तातडीने विचार करण्याची गरज आहे.


महत्वपूर्ण चौकट

अन्यथा बेणसे सिद्धार्थ नगर आणि बेणसे गाव जळून खाक झाले असते…

बेणसे झोतीरपाडा स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबन अडसुळे यांनी सांगितले की, आपत्ती कोणतीही सांगून येत नाही. रिलायन्स नागोठणेचा नवा प्रकल्प बेणसे बौद्धवाडीला लागून उभारला जात आहे. गावालगत 30 फूट उंच संरक्षण भिंत उभारण्याचे काम सुरू होते, मात्र संघर्ष समितीने त्यास विरोध केला. ही भिंत उभी राहिली असती तर फायर ब्रिगेडला गावात पोहोचणे अशक्य झाले असते आणि मोठा अनर्थ घडला असता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button