महाराष्ट्र
चव्हाणवाडी येथील बबन खडके यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू
टेंभुर्णी : चव्हाणवाडी तालुका माढा येथील बबन परमेश्वर खडके राहणार चव्हाणवाडी हे मोहन तुकाराम सलगर यांच्या बेंबळे हद्दीतील शेतात छोट्या ट्रॅक्टरने ऊस बांधत असताना ट्रॅक्टरच्या पात्याला अचानक विद्युत वायर गुंडाळली गेली. सदर वायर मोहन तुकाराम सलगर यांनी खुरप्याने कापली. तोपर्यंत तो बेशुद्ध अवस्थेत पडला होता. त्यानंतर सलगर यांचा मुलगा दीपक सलगर यांना फोन करून सदरची घडलेली घटना सांगितली. त्यानंतर सुनील तानाजी चव्हाण राहणार बेंबळे घटनेच्या ठिकाणी आला. मोहन सलगर व तानाजी चव्हाण यांनी बबनला शेतातून रोड वरती आणले. नंतर दीपक सलगर यांनी चार चाकीवाहनातून बबन खडके यास उपचारासाठी मार्स हॉस्पिटल टेंभुर्णी येथे नेले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. सदर घटना 23 जून 2024 रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी घडली.अशी माहिती मोहन सलगर यांनी पोलीस स्टेशनला दिली. सदर घटनेमुळे खडकी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची चव्हाणवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बबन हा मोहन सलगर यांच्या मेहुणीचा मुलगा आहे. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी व मुलगा असा परिवार आहे.