March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे धन्वंतरी पूजन

ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे धन्वंतरी पूजन
मंगळवेढा – राष्ट्रीय आयुर्वेदिक दिन तथा धन्वंतरी जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे धन्वंतरी पूजन वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश कोडलकर यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी धन्वंतरी जयंती विषयी माहिती देण्यात आली. यावेळी आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल जोशी, डॉ. रेवता स्वामी डॉ. शिरीश कुलकर्णी, डॉ. बनसोडे, डॉ. पवार अधिपरिचारिका मेटकरी, प्रल्हाद नाशिककर, सिद्धाराम चनशेट्टी,डोरले,अभिजित जोगदंड, प्रवीण डांगे उपस्थित होते.