क्राईममहाराष्ट्र

गोवा दारूसह सव्वीस लाखांचा मुद्देमाल जप्त

शिव निर्णय /टेम्भूर्णी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने रविवारी माढा तालुक्यातील टेंभुर्णी व तांबवे परिसरात दोन ठिकाणी छापे टाकून देशी दारू व  गोवा राज्यातील विदेशी दारू व दोन चारचाकी वाहनांसह 26 लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सविस्तर वॄत्त असे की,  राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी 26 नोव्हेंबर रोजी माढा तालुक्यातील टेंभुर्णी- करमाळा बायपास पुलाच्या खाली पाळत ठेवून नंदू अजय मराठे वय 30 वर्षे, राहणार- निमगाव (टे) ता. माढा हा इसम त्याच्या महिंद्रा बोलेरो जीप क्रमांक MH45 AQ 4759 या वाहनातून देशी दारू व गोवा राज्यातील विदेशी दारू वाहतूक करीत असल्याचे आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आले. या गुन्ह्यात आरोपीच्या ताब्यातून देशी दारूच्या विविध ब्रॅंडच्या 180 मिली क्षमतेच्या 624 बाटल्या व गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला मॅक डॉवेल नंबर वन व्हिस्की 180 मिली क्षमतेच्या 280 बाटल्या, रॉयल स्टॅग 180 मिली क्षमतेच्या 170 बाटल्या व एड्रियल  क्लासिक व्हिस्की 750 मिली च्या 132 बाटल्या असा देशी-विदेशी दारूचा साठा व वाहन जप्त केले. या गुन्ह्यात भरारी पथकाने दहा लाख अट्ठ्यांशी हजार आठशे अंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. त्याला सोमवारी मा. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, माढा यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एक अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक, करमाळा विनायक जगताप यांनी निरीक्षक पंढरपूर यांच्या पथकासह तांबवे (मा. माढा) येथे अमोल वसंत खटके याच्या घराच्या पाठीमागील उसाच्या शेतामध्ये धाड टाकून त्या ठिकाणाहून दारू वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत असलेले महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH 45 AF 8548 व गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचा सहा लाख शहाण्णव हजार एकशे वीस रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाहनासह एकूण पंधरा लाख शेहेचाळीस हजार एकशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी अमोल वसंत खटके हा फरार असून त्याचा शोध तपास अधिकारी विनायक जगताप करत आहेत.
या दोन्ही कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाने आठ लाख पंच्यांशी हजार किंमतीची देशी- विदेशी दारू व दोन चार चाकी वाहन असा एकूण सव्वीस लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई अधीक्षक  नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक भरारी पथक सुरेश झगडे, निरीक्षक पंढरपूर किरण बिरादार, दुय्यम निरीक्षक शिवकुमार कांबळे, विनायक जगताप, सहायक दुय्यम  निरीक्षक जीवन मुंढे, जवान अशोक माळी, नंदकुमार वेळापुरे, अण्णा कर्चे, अनिल पांढरे, विकास वडविले, विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत व वाहन चालक दीपक वाघमारे व रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button