March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

खाद्य क्षेत्रात  करिअर घडविणाऱ्यांसाठी बँक ऑफ इंडिया  तर्फे विनामूल्य  फास्ट फूड प्रशिक्षणाचे आयोजन

रायगड :-  पर्यटकांचा आर्कषण केंद्र असलेल्या  रायगड जिल्हयात  विविध निसर्गरम्य ठिकाणे, ऐतिहासिक वारसा, किल्ले, खाद्य संस्कृती आणि अथांग पसरलेला समुद्र,  पर्यटनसोबतच खाद्य पदार्थांकडे वळत चाललेली संस्कृती आणि स्वरोजगाराची तीव्र गरज ओळखून बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्थान, रायगड कडून विनामुल्य  १० दिवसीय फास्ट फूड चे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण आयोजित  केले  आहे.
सदर प्रशिक्षण निवासी/अनिवासी असून संपूर्णपणे विनामुल्य  असणार आहे. फास्ट फूड ह्या व्यवसायाची आवड आणि भविष्यातील संधी ओळखून फास्ट फूड ची संपूर्ण माहिती सोबतच मार्केटिंग, संवाद कौशल्य, प्रकल्प अहवाल, आत्मविश्वास बांधणी असे अनेक विषयांबाबत विषयतज्ञांकडून विनामूल्य प्रशिक्षण देणार आहे. हे  प्रशिक्षण दि. १२ ऑगस्ट २०२४ पासून सुरु होणार असून अधिक माहितीसाठी तसेच नाव नोंदणीसाठी ०२१४१-२२२२१४/ ७५५८६०६७६५ / ७०३०२८४८८४ वर संपर्क करावा.त्याचसोबत दिलेल्या गुगल लिंक https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSch3pzBpqIcT5cB5vJNZdvI_FbtoTaryrL6UkM02UvvXheAQ/viewform?usp=sf_link तसेच QR Code चा वापर करून आपले नाव नोंदवू शकता. प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपले नाव नोंदणी करावी असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे.
प्रशिक्षण संस्थेचा पत्ता : १ ला मजला, पुष्कराज बंगला, पंतनगर, अलिबाग – रायगड.