महाराष्ट्र

खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसहाय्यासाठी ई-केवायसी करावी

सोलापूर, दिनांक 26  :-राज्यातील ज्या कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक ॲप/ पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र लाभार्थीं शेतकऱ्यांना 0.20 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रुपये 1 हजार तर 0.20 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर 5 हजार रुपये (2 हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी  ई-केवायसी प्रक्रिया तात्काळ करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  दत्तात्रय गावसाने  यांनी केले आहे.

            सदरचे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बैंक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे.  यासाठी राज्यातील सर्वसाधारण 96 लाख खातेदार पैकी 68 लाख खातेदार यांनी आपले आधार संमती दिली आहे या पैकी नमो शेतकरी महासंस्मान निधी योजनेत 46.68 लाख आधार क्रमांक जुळले आहेत यांची ई-केवायसी करणेची आवश्यकता नाही. मात्र या व्यक्तिरिक्त राहिलेले 21.38 लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ई-केवायसी करणे आवश्यक आहे.  या पैकी 2.30 लाख खातेदार यांनी दिनांक 25 सप्टेंबर 2024 अखेर ई-केवायसी पुर्ण केले आहे. याव्यतिरिक्त शिल्लक 19 लाख खातेदार यांचे करिता https://scagridbt.mahit.org या पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी करावयाचे आहे. त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदरच्या शेतकऱ्यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा कृषि सहाय्यक त्यांचे लॉगिन मध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांक वर येणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून ई-केवायसी करतील.

        तसेच शेतकरी स्वत: सुध्दा या पोर्टलवर जाऊन ओटीपीच्या माध्यमातून किंवा बायोमॅट्रीकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात जावून सुध्दा ई-केवायसी करू शकतात याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर Disbursement status  येथे Click केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईलवर प्राप्त ओटीपी किंवा CSC केंद्रातील Biometic मशिनच्या माध्यमातून ते ई-केवायसी पुर्ण करू शकतात.  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  दत्तात्रय गावसाने  यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button