250 अक्कलकोट व 251- सोलापूर दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी सर्वसाधरण निवडणूक निरीक्षक म्हणून रितुराज रघुवंशी यांची नियुक्ती
सोलापूर दि.30:- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 250 अक्कलकोट व 251- सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून रितुराज रघुवंशी (भा.प्र.से.) यांची जनरल निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक कालावधीत मा.सर्वसाधारण निरीक्षक रितुराज रघुवंशी (भा.प्र.से.) यांचे वास्तव्य उत्तरा, सोलापूर शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे असणार आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्र. 9209947290 हा आहे. नागरिकांना निवडणूक विषयक भेटायचे अथवा माहिती द्यावयाचे असल्यास सकाळी 11.00 ते दुपारी 01.00 या वेळेत मा. निरीक्षक यांचे वास्तव असलेल्या सोलापूर शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे संपर्क साधता येईल. मा. निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, सोलापूर असणार आहेत. संपर्क अधिकारी यांचा भ्रमणध्वनी क्र. ८८८८८७८२७५ आहे.