“कॅण्डेल लाईट व्हिजील” अर्थात एचआयव्ही / एड्स या आजाराने दगावलेल्या पी.एल.एच.आय. व्ही व सी.एल.एच.आय. व्ही. यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिवे लावून श्रद्धांजली अर्पण.

सोलापूर : नेटवर्क ऑफ सोलापूर बाय पीपल लिविंग विथ एचआयव्ही/एड्स समग्र- विहान प्रकल्प,सोलापूर, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून गुरुनानक चौक येथील महिला व बालरुग्णालयाच्या प्रांगणात एच.आय.व्ही./एड्सने मृत पावलेल्यांच्या स्मृती प्रित्यर्थ सोलापूर शहर व जिल्ह्यातील एचआयव्ही/ एड्स वर काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी रेड रिबन रांगोळी भोवती दिवे लावून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी, जिल्हा पर्यवेक्षक कृष्णा सकट, सांख्यिकी अधिकारी दिनेश राठोड, ए.आर.टी.प्लस सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी रूपाली रायखेलकर, समग्र- विहान प्रकल्प समन्वयीका विजयश्री आमले, एन.एस.ओ.पी. प्लसचे उपाध्यक्ष विजय भाहुले, निरामय आरोग्य धामचे प्रकल्प अधिकारी शिवाजी शिंदे, ब्रम्हदेव श्रीमंगले, फॅमिली प्लॅनिंगचे शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड, प्रकल्प समन्वयक सतीश राठोड, समुपदेशक कपिल भालेराव, प्रकल्प अधिकारी महेश काळोखे, भालशांकर सर, सांख्यिकी अधिकारी आग्नेल फर्नांडिस, अनिता बनसोडे, आरती रेड्डी, बबिता दुपारगुडे, अनिता गायकवाड, अमीना शेख, भरत पाटोळे, अनिल गुंजे आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निरामय आरोग्यधाम, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखा, क्रांती महिला संघ, सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती, संपूर्ण सुरक्षा केंद्र, वाय.आर. जी. केअर एस्सलरेटर प्रकल्प, सेवाधाम ट्रस्ट, ए.आर.टी. प्लस सेंटर, डॉ.व्ही.एम.जी.एम.सी. सोलापूर, डॉ.व्ही.एम.जी.एम.सी. ब्लड बँक, सोलापूर, सोलापूर शहरातील सर्व आय.सी.टी.सी. सेंटर आदी सामाजिक संस्थांनी सहभाग नोंदविला होता.