सामाजिक उपक्रम
कुर्डूवाडीतील सकल मराठा समाजाच्या वतीने प्रांताधिकारी यांना निवेदन

कुर्डूवाडी, कुर्डूवाडी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे यासह विविध मागणीसाठी माढा उपविभागीय अधिकारी यांना सकल मराठा समाजाचे समन्वयक संजय टोणपे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले.अव्वल कारकून यादव यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला सगेसोयरे सहीत ओ.बी.सी. मधुन सरसकट आरक्षणामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीचा प्रश्न अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने प्रलंबित ठेवला आहे. याच मागणीकरीता अनेकवेळा शासनाकडून खोटी आश्वासने देऊन मराठा समाजाची दिशाभूल व फसवणूक केली गेली आहे. या मागणीकरीता अंतरवाली सराटी येथे संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले होते. दि. १३ रोजी शासनाच्या शिष्टमंडळाच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. मागण्या मराठा समाजाला ओ.बी.सी. मधुन आरक्षण द्या,ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांचे सगेसोयरे यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, ज्यांच्या थेट नोंदी सापडल्या नाहीत. त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घेऊन कुणबी प्रमाणपत्र द्या,कोर्टातून आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाचे मुलामुलींसाठी शिक्षण शंभर टक्के मोफत करा व जिल्हा स्तरावर वसतीगृह बांधा, मराठा आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकर भरती करु नयेत अथवा केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवाव्या,अंतरवाली सराटी सह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या. एस.ई.बी.सी. अंतर्गत २०१४ च्या वर्ग-१ व २ आणि पोलिस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या ताबडतोब द्या. हैदराबाद गॅझेट चा आधार घेऊन मराठ्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा. शिंदे समितीला, मुदतवाढ देण्यात यावी. या प्रसंगी समन्वयक संजय टोणपे, आप्पासाहेब उबाळे, सुरेश बागल, सचिन जगताप, अविनाश पाटील, बालाजी जगताप, वाहिदभाई शेख, निलेश देशमुख, अरूण जगताप, हरी बागल अॅड. विजयकुमार आडकर, अॅड. शशिकांत भोरे, प्रमोद बागल, विजयकुमार परबत, गणेश व्यवहारे, बाळासाहेब बागल, अविनाश जगताप, कालिदास बागल, रणजित मराळ, हरी भराटे, कांतीलाल नवले, माऊली अनभुले, शंकर उबाळे, प्रशांत जगताप, हर्षद पोळके, रामभाऊ जगताप,किरण पवार, प्रशांत ढेकळे, श्रीकांत गायकवाड, सौरभ भोसले, नवनाथ कडबाने, नागेश गवळी, प्रशांत बागल, लक्ष्मण बागल इ. उपस्थित होते.