रायगड : बालकांना काळजी व संरक्षणासाठी बाल कल्याण समिती, रायगड यांच्या आदेशाने बालग्राम महाराष्ट्र, संचलित पंचदिप संकुल, से-12, प्लॉट नं-06, खांदा कॉलनी, सीकेटी कॉलेज समोर, पनवेल, जि.रायगड येथे काळजी व संरक्षणासाठी दाखल करण्यात आले असून त्या मुलांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. 1) कु.गौरी जानू पवार, वय 08 वर्षे व कु.मधुरा जानू पवार वय 10 वर्षे 9 महिने, (दोन सख्ख्या बहिणी), 2) कु. शाबीर शेख, वय 09 वर्षे 10 महिने व कु.अब्दुल शेख वय 06 वर्षे 9 महिने, (दोन सख्खे भाऊ), 3) कु.प्रतिक धर्मा पाळमेळ, वय 9 वर्षे 10 महिने, 4) कु.सचिन मनोज गायकवाड वय 15 वर्षे 7 महिने.
या सहा बालकांचे पालक व नातेवाईकांनी हे वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून तीस दिवसांच्या आत नामे संस्था बालग्राम महाराष्ट्र, संचलित पंचदिप संकुल, से-12, प्लॉट नं-06, खांदा कॉलनी, सीकेटी कॉलेज समोर, पनवेल, जि.रायगड 410206, मो.क्र.9823702297 वर संपर्क साधावा, अन्यथा बालकांची जबाबदारी घेण्यास कोणीही नाही असे समजून बाल कल्याण समिती, रायगड यांच्या मार्फत बालकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.
संपर्कासाठी पत्ता: बालग्राम महाराष्ट्र, संचलित पंचदिप संकुल, से-12, प्लॉट नं-06, खांदा कॉलनी, CKT कॉलेज समोर, पनवेल, जि. रायगड, मो.क्र. 9823702297, जिल्हा महिला व बालविकास विभाग, अलिबाग रायगड, संपर्क नंबर 7775018197.




More Stories
गेल्या ३२ वर्षांपासून प्रलंबित एम.फिल. अर्हताधारकांचा प्रश्न सोडवल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार
नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पेण येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबीर