महाराष्ट्र
कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी आंदोलन दरम्यान रक्तदान

शिव निर्णय / सोलापूर : गेल्या 30 दिवसापासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांचे आंदोलन जिल्हा परिषद सोलापूर श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथे आंदोलन सुरू आहे. सरकारने आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे मात्र या आंदोलनकर्त्यांनी जिल्ह्यामध्ये रक्ताचा पुरवठा कमी असल्याने माणुसकीचे दर्शन घडवत आंदोलनातच रक्तदान शिबिर आयोजित करून ४६ बाटल्या रक्तदान हे अतहर ब्लड बँक सोलापूर या रक्तपेढिला संकलित करून दिल्या आहेत. संपूर्ण राज्यात हे आंदोलन सुरू असून या आंदोलनाचा आज ३० वा दिवस होता या आंदोलनात राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी तसेच राष्ट्रीय क्षयरोग व कुष्ठरोग अभियानातील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचारी शहर व ग्रामीण तसेच आयटक नर्सेस युनियन यांनी काम बंद आंदोलनामध्ये सहभागी असल्यामुळे सोलापूर शहर व ग्रामीण आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली आहे काम बंद आंदोलनामुळे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियान, लसीकरण, गरोदर माता यांची तपासणी बाह्य रुग्ण विभाग अंतर रुग्ण विभाग क्षयरोग रोगाची तपासणी व औषधोपचार तसेच क्षयरुग्णांना औषध उपचार कालावधीमध्ये दर महा ५००/- रुपये इतके आहार भत्ता डी बी टी द्वारे दिले जाते. अशा प्रकारचे कामकाज पूर्णता बंद आहे.
राज्य शासनाची सक्रिय क्षयरोग शोध मोहीम सोलापूर शहरी व ग्रामीण मध्ये राबविण्यात येत असून कर्मचारी अभावी सदरील मोहीम प्रभावशाली राबविली जात नाही असे दिसून येत आहे. शासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीतर आम्ही आंदोलन पुढे अधिक तीव्र करू तसेच आमरण उपोषणाचे हत्यार उपसणार आहोत असे कृती समिती समन्वयक यांनी सांगितले आहे.