महाराष्ट्र

उमरड येथे दारू व झुगार बंद करण्यासाठी राजकारण बाजूला ठेवून सर्व ग्रामस्थ एकत्र

करमाळा तालुक्यातील उमरड गावामध्ये खुले आम बाजारपेठेमध्ये दारू झुगार सारखे अवैद्य धंदे खुलेआम चालू आहेत अवैध धंद्यांना ग्रामस्थ त्रासून गेलेले आहेत दारू जुगार बंद करा असा महिलांचा आक्रोश सुरू आहे त्यामुळे अखेर दारू, झुगार बंद कारण्यासाठी दारू बंदी चळवळ उभा राहिली असून प्रामुख्याने राजाभाऊ कदम, ग्रा सदस्य समाधान वलटे, भगवान चौधरी, प्रमोद कुलकर्णी, राजू गोडगे यांनी गावकऱ्यांना एकत्र येण्याचे आव्हान केली त्या आव्हानाला प्रतिसाद देत शेकडो ग्रामस्थ बैठकीला उपस्थित राहिले बैठकीमध्ये गावकऱ्यांचा एकच सूर निघाला दारू जुगार गावातील कायमची बंद झाली पाहिजे यासाठी उमरड गावचे आजी-माजी सरपंच सदस्य यांनी भागच घेतला पाहिजे असे ग्रामस्थांचे म्हणणे आले आजच्या बैठकीला विद्यमान उपसरपंच मुकेश बदे ,माजी सरपंच बापू चोरमले, ग्रामपंचायत सदस्य इरफान शेख , ग्रामपंचायत सदस्य चांगदेव चौधरी उपस्थित होते.
यावेळी असे ठरले की अवैद्य दारू विक्रेते झुगार चालवणारे यांना बैठकीत बोलउन जुगार व दारू बंद करण्याच्या सूचना देण्याचे ठरले ,पोलिसस्टेशनाला रीतसर निवेदन द्यावयाचे, दारूची दुकाने व झूगार बंद कारण्यासाठी गावकर्यांनी पुढाकार घेऊन अवैद्य धंद्यांना टाळे ठोकायचे ठरले
यावेळी सारिका शिंदे,कल्पना कदम,साखरबाई इंगळे,राणी कदम,मंगल कदम,शितल शिंदे,सुमन शिंदे,संगीता वाघ,छाया शिंदे,रूपाली साळुंखे,शबानाशेख,प्रियंका चौधरी,रंजना पाखरे,मंगल टोणपे,धनश्री चंद्रशेखर पाटील,नकोशा शिंदे,लता मोरे,वत्सला सुरवसे,बाळू बाई कदम,रंजना पाखरे,विजूबाई कदम,कोमल कदम
आदी शेकडो ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button