March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात  घट

उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात  घट

बेंबळे  ;   उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात  घट होत असून मंगळवारी सायंकाळी सहा वाजता दौंड येथून 33 हजार590 क्युसेक्स विसर्गाने पाणी जलाशयात येत आहे .तरी परंतु मागील दोन दिवसात  जलाशयात आलेल्या मोठ्या विसर्गामुळे सध्या उजनीची पातळी 497.180 मिटर असून धरणात 121.44 टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. धरण 107.85% पर्यंत पोहोचले असून आगामी दोन ते अडीच महिन्याच्या पावसाळ्यात धरणातील पाणी पातळी नियंत्रणा ठेवण्यासाठी धरण नियंत्रण विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. धरणातील पाणी नियोजित पातळीला पोहोचण्यासाठी अवघे दोन टीएमसी व चार टक्के पाणीसाठा होणे आवश्यक आहे, परंतु आगामी पावसाळ्याचा विचार करता पाणी पातळी नियंत्रणात ठेवणे कसोटीचे काम होणार आहे. उजनी धरणातून भीमा नदीत 80 हजार क्युसेक्स विसर्गाने पाणी सोडण्यात येत आहे, त्याचप्रमाणे वीज निर्मिती, कालवा ,बोगदा, सीना माढा व दहीगाव सिंचन योजना याद्वारे सुद्धा जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. मागील आठ ते दहा दिवसात पुणे जिल्ह्यात दमदार आणि मोठे पाऊस झाल्यामुळे व उजनीच्या वरील 19 धरणे  पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेला आहे व सध्या उजनी देखील नियोजित पातळीपर्यंत पाणी साठा झालेला आहे. परंतु असे असले तरी सोलापूर जिल्ह्यात मात्र पावसाची नितांत आवश्यकता आहे. जिरायत  व बागायत शेतकरी सद्ध्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत. कालवा बोगदा व सिंचन योजना यातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याचा वापर निश्चित होईल. परंतु सध्या नुसते ढगाळ वातावरण आहे व जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची नितांत गरज आहे. कालवा बोगदा आणि सिंचन योजना सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे परंतु हे पाणी चालू असताना वीज पुरवठा मात्र सतत खंडित आणि कमी दाबाने होत आहे त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे
***उजनी धरण वृत्त****
मंगळवार 6 ऑगस्ट सायंकाळी ७ वा.
…. पाणी पातळी 497.160 मीटर
एकूण साठा 3432.24 दशलक्ष घनमीटर
121.20 टीएमसी
उपयुक्त साठा 1629.43 दशलक्ष घनमीटर
57.54 टीएमसी
**टक्केवारी… 107. 40% **
*दौंड येथून येणारा विसर्ग …
33 हजार 590 क्युसेक्स
*बंडगार्डन विसर्ग 13 हजार 830 क्युसेक्स
**वीर मधून निरा नदीत विसर्ग बंद केला आहे.
** धरणातून विसर्ग …
…भीमा नदी 80 हजार क्यूसेक्स
….वीजनिर्मिती 1600 क्युसेक्स
(एकूण 81 हजार 600क्युसेक्स)
….. कालवा 1600 क्युसेक्स
..भीमा-सीना जोडकालवा-बोगदा900क्युसेक्स  ..
….सीना माढा सिंचन योजना 210 क्युसेक्स
…..दहिगाव 100 क्युसेक्स.