सोलापूर
अहिल्यादेवीचे विचार आत्मसात करण्याची गरज : मैत्रेयीताई शिरोळकर

शिव निर्णय / सोलापूर : अहिल्यादेवीचे विचार आत्मसात करण्याची गरज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सुशासन या विषयावर समितिच्या प.म.प्रांत बौद्धिक प्रमुख मा. मैत्रेयीताई शिरोळकर यांचे व्याख्यान शिवस्मारकच्या सभागृहात झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक मा.भाग्यश्रीताई जाधव होत्या.
व्यासपीठावर अधिवक्ता परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष ॲड. धनंजयराव माने, शहर अध्यक्ष अग्रवाल, समितिच्या सोलापूर जिल्हा कार्यवाहिका देवयानीताई देशमुख हे मान्यवर होते.
अहिल्यादेवींच्या शासनातील राजकारण, समाजकारण, न्यायनिवाडा, पर्यावरण, प्रजेची काळजी,राष्ट्र हितासाठी अनेक रूढींना छेद देत उपभोगशून्य जीवन जगत सुशासन, संरक्षण, महिलांची सेना उभारणी अशा अनेकानेक पैलूंची माहिती पोचवली. ओघवती भाषा, स्पष्ट विचार व्यक्त करत श्रोत्यांचे समाधान केले.
कार्यक्रमात पद्य, अपर्णाताई सहस्रबुद्धे यांच भारूड याने रंगत आणली. प्रास्ताविक समितिच्या सोलापूर जिल्हा कार्यवाहिका देवयानीताई देशमुख यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ.यशश्रीताई जोग यांनी केले.
संपूर्ण वंदे मातरम् म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.