सोलापूर

‘असा पाडा’ ‘असा पाडा’ परत ‘शरद पवारांचा नाद नाय केला पाहिजे’

माढा विधानसभेचे उमेदवार अभिजीत पाटील, यांच्या प्रचारार्थ टेंभुर्णी मध्ये शरदचंद्र पवार यांची सभा. 

टेंभुर्णी   :  टेंभुर्णी तालुका माढा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद चंद्र पवार यांची सभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना पवार म्हणाले की असा पाढा, असा पाडा की परत पवार साहेबांचा नाद केला नाही पाहिजे.
पुढे बोलताना शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या गाजलेल्या वाक्याचा आधार घेत. अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन करत ‘असा पाडा’ ‘असा पाडा’ परत ‘शरद पवारांचा नाद नाय केला पाहिजे’ संबध राज्यात हा मेसेज गेला पाहिजे असे म्हणताच उपस्थित हजारो नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला.
 कधी नव्हे ते गेल्या दोन वर्षांत फडणवीस यांच्या काळात ३८ हजार महिलांवर आत्याचार झाले असून दर तासाला ५ महिलांवर आत्याचार झाली असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माढा विधासभा उमेदवार अभिजीत पाटील व मोहोळ विधासभा मतदारसंघाचे उमेदवार राजु खरे यांचा प्रचारार्थ टेंभूर्णी येथील आयोजित सभेत ते बोलत होते.
 ते पुढे म्हणाले राज्यातील ६४ हजार मुली गायब आहेत. अशा व्यक्तीला सत्तेवर बसण्याचा अधिकार नसल्याची टिका शरद पवार यांनी केली. नोकरी नसल्याने लाखो तरूण बेरोजगार आहेत. देशाचा पंतप्रधानांनी १८ उद्योगपतींचे १६ हजार कोटींचे कर्ज माफ केले मात्र शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही. यावेळी शरद पवार यांनी आ. बबनराव शिंदे यांच्यावर टिका केली. ते म्हणाले गेल्या ४० वर्षांत सिना-माढा योजना, कारखाने व सहकारी संस्थां उभ्या करायला मदत केली. मात्र संकटाचा काळात त्यांनी पळ काढला. मी या भागाचा खासदार व मंत्री असताना अनेक निधी दिला मात्र याच श्रेय घेतल नाही. बबनदादादांच्या हाती निधी दिला, अधिकर दिला त्यांनीच विश्वासघात केला. इडीची नोटीस आल्यावर हा गडी गायब झाला. इडीची नोटीस आली म्हणून पळून जायच नसत. ज्याचे हात स्वच्छ आहेत त्यांनी कोणाचाही बापाला घाबरायची गरज नसल्याची बोचरी टिका त्यांनी बबनराव शिंदे यांच्यावर केली.
यावेळी व्यासपीठावर मा. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते, खा. धैर्यशील मोहिते, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, भुषणराजे होळकर, उत्तम जानकर, शिवतेजसिंह मोहिते, उमेश पाटील, भारत शिंदे, रावसाहेब देशमुख, मधुकर देशमुख, संजय पाटील, बाळासाहेब पाटील, सुरज देशमुख, मा. सरपंच प्रमोद कुटे, औदुंबर देशमुख, भारत पाटील, संजय कोकाटे, सुवर्णा शिवपुजे,  प्रमोदिनी लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘असा पाडा’ ‘असा पाडा’ परत ‘शरद पवारांचा नाद नाय केला पाहिजे’…
यावेळी बोलताना शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्या गाजलेल्या वाक्याचा आधार घेत. अपक्ष उमेदवार रणजितसिंह शिंदे यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन करत ‘असा पाडा’ ‘असा पाडा’ परत ‘शरद पवारांचा नाद नाय केला पाहिजे’ संबध राज्यात हा मेसेज गेला पाहिजे असे म्हणताच उपस्थित हजारो नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला.
 गेल्या 30 वर्षांपासून सलग सहावेळा आमदार राहिलेल्या बबनराव शिंदे यांचा थेट सामना शरद पवार यांचाशी असल्याने टेंभूर्णीतील सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होतो. 
 शरद पवार काय बोलतात यासाठी सभेला आतापर्यंतची सर्वात मोठी गर्दी दिसून आली. 
 सभेचा गर्दीमुळे मार्केट यार्ड, सोलापूर- पुणे महामार्गावर तसेच टेंभूर्णी कुर्डूवाडी रोडवर वाहतूक कोंडी झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button