अपहृत मुलीची माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन
सोलापूर दि.14:- सोलापूर तालुका पोलीस ठाणे, ग्रामीण गुरूनानक चौक यांच्या माहिती नुसार दि. 28 एप्रिल 2024 रोजी अल्पवयीन मुलीगी कु. वैष्णवी विकास शिंदे वय 17 वर्षे 9 महिने, राहणार संभाजी नगर , हगलूर ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर येथून दूपारी 01. 00 वा.आसपास या अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असून. अपहृत मुलीचे वर्णन -बांधा सडपातळ, रंग गोरा, उंची 6 फूट, शिक्षण 12 वी पास, भाषा मराठी, केस लांब –काळे असून, अंगात काळी पँट व जांभळ्या रंगाचा टॉप आहे. या बाबत श्री विकास नागनाथ शिंदे, वय 38 राहणार संभाजी नगर , हगलूर ता. उत्तर सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे.
या अपहृत मुलीचा शोध होणे कामी काहि माहिती मिळाल्यास महिला पोलीस उपनिरीक्षक सोलापूर ता. पोलीस (ग्रामीण) गुरूनानक चौक (फोन-0217-2732017) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महिला पोलीस उपनिरिक्षक एन.एस.गंपले यांनी केले आहे.