अक्कलकोट येथ ऑनलाईल द्वारे फसवणूक, खातेदार मध्ये एकच खळबळ उडाली.
SHIV NIRNAYअक्कलकोट : अक्कलकोट येथील रहिवाशी सचिन शंकरराव बगले यांचे सोलापूर येथील एक्सीस बँकेचे खात्यातून सुमारे पाच लाख पाच हजार तीनशे सात रुपये ऑनलाईल द्वारे फसवणूक करून काढून घेतले बाबत अक्कलकोट उत्तर पोलिस ठाणेत गुन्हा दाखल झाला आहे.यामुळे खातेदार मध्ये एकच खळबळ उडाली.
या बाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी,सचिन शंकरराव बगले
वय ४८ व्यवसाय एल. आय. सी. एजेंट रा नेहरू गल्ली ६५७ ब शहाजी वाचनालया पाठीमागे राहणार असून सोलापूर येथील एक्सीस बँकेचे तीन वेगवेगळे खाते आहेत. त्याचा सेविंग खाता, ओव्हर ड्राप (ओ.डी.) खाता,कॅश क्रेडीट (सी.सी.)आकाऊंट असे खाते आहे. दिनांक १४/०९/२०२३ रोजी दुपारी ०२/३५ वा.चे सुमारास सचिन शंकरराव बगले हे अक्कलकोट येथे पोस्टात कामानिमीत्त असताना त्यांना मो.नं. ९८२२५३४०८९ वरती अनोळखी मो.क्र.९६७६३५०९६४ वरुन फोन आला. आम्ही एक्सीस बँकेतून बोलत आहोत. तुमचे पॅनकार्ड लिंक होत नाही. असे म्हणुन अॅक्सीस बँकेचे अँप डाउनलोड करा. असे सांगीतले. या प्रमाणे प्रोसेस करीत असताना तेव्हा सदर ऑपवर कस्टमर आयडी घाला असे सांगण्यात आले. तेव्हा *४०१*९६०६५६४२३६ असे टाईप करण्यास संगीतले .त्यांचे सांगणे प्रमाणे सचिन बगले प्रोसेस करीत होतो. त्यानंतर त्यांनी कस्टमर आयडी मध्ये तुमचा डेबीट कार्ड नंबर टाईप करा. असे म्हणाल्यावर सचिन बगले याना संशय आले.तेव्हा सचिन यांनी बँकेत जाऊन तेथील अधिकारी यांना भेटुन तुम्हाला फोन करतो असे म्हणून बँकेत जात असताना सचिन यांना मोबाईल फोन वरती मेसज आला. तो मेसेज पाहीला असता त्यात ओव्हर ड्राप (ओ.डी. ) खाते क्र.९२३०३००४६४११४४७ मधुन रक्कम रुपये १०००/-९४,९८३/- व ९९,५००/- रुपये डबीट झाल्याचे मेसेज आला. तेव्हा सचिन यांनी अक्कलकोट येथील बँकेत जावुन त्यांचा खाते क्रमांकावरील रक्कम थांबविण्याची विनंती केली.तेव्हा बँकेतील अधिकारी त्यांना चेक बुक ची मागणी केले. घरी जावुन चेक बुक घेवुन बाँकेत जाई पर्यंत पुन्हा ९९,३२४/-,९९,५००/-,९५,०००/- व ६,०००/- रक्कम रुपयाचे चार ट्रान्जेक्शन झाल्याचे कळाले. असे एकुण ४,९५,३०७/- इतकी रक्कम डेबीट झाल्याचे कळाले.तेव्हा बँक अधिकारी यांना माझ्या खात्यातील उर्वरीत रोख रक्कम ४,५४,७९९ /- रूपये काढून चेकद्वारे सचिनचे परिचयाचे डॉक्टर प्रदिप धिवारे यांचे खात्यावर ट्रान्सफर केले. यानंतर दिनांक १५/०९/२०२३ रोजी सकाळी साडे दहा वा. चे सुमारास कामानिमित्त बाहेर असताना पुन्हा माझे सेव्हींग खाते क्र. ९२३०१००४३४३४२८० मधुन ३०००/- रूपये व (सी.सी.) आकाऊंट क्र.९२३०३००४६५११४६३ वरून रक्कम रूपये ७०००/- रूपये काढून घेतले बाबत मेसेज आला. असा एकूण पाच लाख पाच हजार तीनशे सात रुपये इतकी रक्कम फसवणूक करून घेतले आहे. या बाबत पोलिस अधिकारी तपास करीत आहे.