सोलापूर, दि. 02 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची दि. 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत होती. परंतु विद्यार्थ्याचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र व विद्यार्थ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी विचारात घेता विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पोर्टल वरती अर्ज भरण्यासाठी दि.16 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली असून, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2024-25 या वर्षात सोलापूर शहरातील व सोलापूर महानगरपालिका हद्दीपासून 5 किमी परिसरात असलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील पात्र नवीन व नुतनीकरण झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी http://hmas.mahait.org या पोर्टलवर दि. 16 डिसेंबर पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा असे आवाहनही समाजकल्याण सहायक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी केले आहे.



More Stories
सोलापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या गाडीचा अपघात
श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर अंतर्गत विध्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन
विधानसभा निवडणुकीत भाजपनेच केला शहाजी पाटलांचा गेम