March 7, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

संगम येथे रत्नाईच्या कृषीकन्यांनी लघु उद्योगा विषयी केले मार्गदर्शन

संगम येथे रत्नाईच्या कृषीकन्यांनी लघु उद्योगा विषयी केले मार्गदर्शन

संगम येथे रत्नाईच्या कृषीकन्यांनी लघु उद्योगा विषयी केले मार्गदर्शन
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज येथील कृषीकन्यांनी  माळशिरस तालुक्यातील संगम येथे महिला शेतकऱ्यांना बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असणारे कमी जागेचे व कमी भांडवलात करता येणाऱ्या लघु उद्योगांविषयी माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले.
यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्राम सिंह मोहिते पाटील प्राचार्य आर .जी .नलवडे ,कार्यक्रम समन्वयक प्रा .एस .एम एकतपुरे ,कार्यक्रम अधिकारी प्रा .एम .एम चंदनकर, प्रा .एच. व्ही कल्याणी तसेच  यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या साक्षी सोनवणे, प्रियंका काळदाते पाटील , गौरी कुबेर, प्रियांका कोकरे, साक्षी घाडगे, वनश्री सुतार , गीतांजली ढेकळे, पूजा सलगर, वर्षा गलंडे यांनी सांगितले की  महिलांनी शेतीवर विसंबून न राहता शेतीशी निगडित असणारे अनेक लघुउद्योग करून स्वतःचा व त्याचबरोबर आपल्या देशाचा विकास साधला पाहिजे बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असणारे व अतिशय कमी जागा व थोड्या भांडवलामध्ये करता येणारे केळीचे वेफर्स, पपईचा जाम व पनीर बनवणे यासारखे लघुउद्योग चालू करून स्वतःचा व आपल्या गावाचा विकास करून देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान देता येते.
यावेळी कृषीकन्यांनी केळीचे वेफर्स कसे बनवले जातात, पपई पासून जाम कसा बनवला जातो व दुधापासून पनीर कसे बनवले जाते याचे प्रात्यक्षिक करून महिलांना दाखवले व महिलांना लघुउद्योग करण्यासाठी प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाला अनेक महिलांनी त्यांची उपस्थिती दर्शवली.