March 11, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

महाड येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात विद्यार्थींनींकरिता मोफत प्रवेश सुरु

महाड येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात विद्यार्थींनींकरिता मोफत प्रवेश सुरु

रायगड, :  सामाजिक न्याय विभागामार्फत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण रायगड यांच्या अधिनस्त मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह महाड येथे कार्यरत आहे. वसतिगृहाकरिता सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. या वसतिगृहात इयत्ता आठवी पासून पुढे शिकणाऱ्या विद्यार्थिनीना गुणवत्तेनुसार व प्रवर्गनिहाय प्रवेश दिला जाईल. शालेय 30 जागा, इयत्ता 11 वी, 12 वी 15 जागा, वरिष्ठ महाविद्यालय- 15 जागा व व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता -15 विद्यार्थिनींना प्रवेश दिला जाईल. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास, भटक्या जमाती इत्यादी संवर्गात इयत्ता आठवी पासून व भंगी, मांग, गौड, कातकरी, माडिया इत्यादी जमातीमधील विद्यार्थिनीना इयत्ता पाचवीपासून विशेष प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल.

 वसतिगृहात मोफत देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा पुढीलप्रमाणे- प्रतिवर्षी महाविद्यालयीन विद्यार्थिनींना पुस्तके, शैक्षणिक साहित्य खरेदीकरिता शैक्षणिक साहित्य भत्ता रु.4 हजार,  दररोज दूध-नाष्टा, दोन अंडी / कॉर्नफ्लेक्स, सफरचंद व ऋतुमानानुसार उपलब्ध असणारे 1 फळ, दोनवेळचे जेवण, आठवड्यातून 2 वेळा चिकन / मटण देण्यात येते.  बेडशीट, चादर, ब्लॅकेट, सतरंजी, उशीचाअभ्रा, ताट, वाटी, पेला इत्यादी पुरविले जाते. विद्यार्थिनींना शालेय गणवेशाकरिता प्रतिवर्षी रु.1 हजार महाविद्यालयीन गणवेशाकरिता प्रतिवर्षी रु.2 हजार.  प्रतिवर्षी सायन्स शाखेकरिता अॅप्रनिभत्ता रु.500, छत्री व गमबूटकरिता प्रत्येकीस प्रतिवर्षी रु.500, प्रतिमहा प्रति विद्यार्थिनीस रु.500/ निर्वाहभत्ता व प्र. साहित्य भत्ता रु.100/- देण्यात येतो. शैक्षणिक सहल, वार्षिक स्नेहसंमेलन, पालकसभा, विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध उपक्रम. दैनंदिन योगासन वर्ग व साप्ताहिक समाजसेवा तासिक घेतली जाते.  दैनिक वृत्तपत्रे, ग्रंथालय सुविधा, संगणक सुविधा तसेच अभ्यासिका सुविधा पुरविण्यात येतात.

वसतिगृह प्रवेशाकरिता आवश्यक कागद‌पत्रे :- मागील इयत्तेची मार्कलिस्ट झेरॉक्स. शाळा सोडल्याचा दाखला / बोनाफाईट झेरॉक्स व विद्यार्थिनीचा 1 फोटो. तहसीलदाराकडील उत्पनाच्या दाखल्याची झेरॉक्स (उत्पन्न अट SC, ST.2,50,000 व इतर जातीच्या विद्यार्थिनीना 1,50,000). SC/ST/VJNT/OBC या प्रवर्गातील विद्यार्थिनीकरिता जातीच्या दाखल्याची झेरॉक्स. आधारकार्डची झेरॉक्स. कोअर बँके चे खाते क्रमांक, आय.एफ.सि. कोडसह या वसतिगृहात प्रवेश प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या विद्यार्थिनीच्या पालकांनी वसतिगृह कार्यालयात 10 ते 6 या वेळेत संपर्क साधाबा. शासनाकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारणेचे आदेश येईपर्यंतच्या कालावधीत कागदपत्रे जोडून ऑफलाईन अर्ज सादर करण्यात यावा. सदरचे प्रवेश अर्ज वसतिगृह कार्यालयात विनामुल्य स्वरुपात उपलब्ध होतील.

संपर्कासाठी पत्ता :-प्र. गृहपाल, श्रीमती के. एस. गिरीमागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, महाड हॉटेल सीमा गार्डन शेजारी, चांभारखिंड, महाड जि. रायगड, संपर्क क्रमांक 9529166656, स्वप्नाली धोत्रे,7507495080, सुप्रिया कुबल, 8530177941.