रायगड दि.28:- आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर यांचे पत्र दि. 12/01/2025 अन्वये आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर यांच्या संदर्भिय पत्रान्वये जिल्हा सैनिक बोर्ड रायगड अलिबाग या ठिकाणी माजी सैनिक/ युध्द विधवा/वीर पत्नी यांच्या पाल्यांकरीता अकरावी व बारावी प्रवेशाकरीता आर्मड फोर्सेस प्रिपेटरी ईन्सीटयुट कोल्हापुर (AFPI) मध्ये खालील प्रमाणे दोन निवासी कॅम्प्स आहेत.ते पुढीलप्रमाणे-अ) Dr. Cyrus Poonawala International School, Peth Vadgaon, Kolhapur., ब) Tatyasaheb Kore Military Academy,Warnagar, Kolhapur.
तरी रायगड जिल्हयामधील इच्छूक ठिकाणी माजी सैनिक/ युध्द विधवा/वीर पत्नी यांच्या पाल्यांच्या प्रवेशाकरीता 11 मे 2025 रोजी होणा-या ऑनलाईन परीक्षेसाठी आता नोंदणी सुरु आहे. रजिस्ट़ेशन वेबसाईट www.afpi.in या संकेतस्थळावर माजी सैनिकांनी नोंद करावी.तसेच 7030900540/41/42 या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन ले.कर्नल राहुल वैजनाथ माने (निवृत) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.



More Stories
गेल्या ३२ वर्षांपासून प्रलंबित एम.फिल. अर्हताधारकांचा प्रश्न सोडवल्याबद्दल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार
नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीसंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
पेण येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबीर